खडसेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांनी केलं पहिल्यांदाच भाष्य….म्हणाले

0

मुंबई : स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील नाराजी व्यक्त केली. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. “एकनाथ खडसेंनी अशा प्रकारे त्यांनी बोलायला नको होतं. ते व्यासपीठ त्यासाठी नव्हतं”, असं फडणवीस म्हणाले.  खडसे यांच्या मुलीला तिकीट दिलंच की. त्यांना तिकिट न देण्याचा केंद्राचा निर्णय होता. राज्यातून नव्हता, असेही ते म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी मुंडे आणि खडसे यांच्या पक्ष सोडून जायच्या चर्चांवर भाष्य केलं.

नाथाभाऊ अनेकदा असं बोलतात ते त्यांच्या मनात नसतं पण ते बोलून जातात. मात्र यामुळं त्यांचं नुकसान होतं, असंही फडणवीस म्हणाले. खदखद योग्य ठिकाणी मांडायला हवी. त्यांनी अशाप्रकारे बोलायला नको होतं. मंचही योग्य नव्हता. तो जयंतीचा कार्यक्रम होता, असंही फडणवीस म्हणाले.भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होत नाही. हा ओबीसींचाच पक्ष आहे, असं ते म्हणाले. खडसेंबद्दल किंवा ओबीसी समाजाबद्दल राग असता तर त्यांच्या मुलीला पक्षाने तिकीट दिलंच नसतं, असंही ते म्हणाले.

खडसेंवर आरोप झाले म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लावला हे खोटं आहे. पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठिशी होते. कुण्या एका संशयित आरोपीच्या सांगण्यावरून तर खडसे यांना नक्कीच काढलं गेलेलं नाही.  खडसेंवर आरोप लागले, त्यानंतर मी तातडीने त्याच्या चौकशीचे आदेश ATS ला दिले आणि 12 तासात एटीएसने तो आरोप खोटा आहे हा रिपोर्ट दिला. एटीएसने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली. पण कसं आहे, पराभवाची चर्चा जास्त होते. पक्षाला जिंकून देखील हरावं लागलं त्यामुळे जास्त चिंतन  केंद्रीय नेतृत्वाने दिलं. खडसेंना तिकीट देणं न देणं हा केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय होता. तिकीट का कापलं याचं कारण एकनाथ खडसेंना हवं असेल  तर केंद्रीय नेतृत्व ते कारण देईल, अशी फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.