चोपड्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

0

चोपडा (प्रतिनिधी) : येथे अंगणवाडी  सेविका  मदतनीस व खाऊ बनवणारे बचत गटांचा विविध  मागण्यांसाठी ”एकजूटीचा मोर्चा”  प्रकल्प कार्यालयावर   काढण्यात आला. हा मोर्चा बोहरागल्ली आझाद चौक छत्रपती शिवाजी पुतळावरून चोपडा पंस वर बालविकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला. दरम्यान, यावेळी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  यांनी यूनियनचे निवेदन स्वीकारून चर्चा केली असता ” सादिल खर्च..बचत गटांची बिले सिमकार्ड रिचार्ज  गणवेशाचे पैसे.. 5दिवसात कर्मचारी व खाऊशिजवणारे गटांना मिळतील ..  गणवेशाबाबत खरेदिचे 2017/18 बिले कर्मचारी नी त्वरित आणून देण्याची अपेक्षा आहे.. आदीवासी भागात 21अंगणवाड्या बांधण्यात येणार असून ग्रा पं बझेटमधून 10%रक्कम काही अंगणवाडी केंद्राच्या गैरसोयी दूर होऊ शकतात असे गटविकास अधिकारी यांनी चर्चेत माहिती दिली सर्व्हिस सेंटरमधून..मोबाईल दूरस्ती केल्याची बिले द्यायला भाग पाडू असे सांगून  गटविकास अधिकारी यांनी ते बिल देणे बंधनकारक आहे हे ठासून सांगितले   कर्जाणा सेविकेचा अतिरिक्त कामाची धावपळ लक्षात घेता दोन्ही अंगणवाडी एका ठिकाणी भरवावीत असा लेखी आदेश देण्याचे मान्य केले  यामागण्यां शिवाय प्रकल्पातील सर्व रिक्त जागा भरणे मानधनवाढ फरक.. भाऊबीज थकित प्रवास बिले.. बचत गटांची बिले मोबाईल हाताळणी प्रोत्साहन भत्ता देणे.. मोबाईल दूरस्ती खर्च सिबीईचे पैसै मिळणे साठी पाठपूरावा करू…. ..ईशारा– मोबाईल पूर्ण खराब झाला वा हरवला तर कार्रयालयाने दूसरा मोबाईल पूरवावा.. मोबाईल बाबाबत जास्त बादरेशन दिल्यास जिल्ह्य़ातील सेविका सर्व मोबाईल ऑफिसला जमा करतील* असा ईशारा काॅ महाजन यांनी  त्यावेळी दिला..अंगणवाडी कर्मचार्यांचे प्रश्न सनदशीरlमार्गाने मांडण्याचा प्रयत्न सूरू असता लासूर सुपरवायझरनी मूद्दाम मिटींगा ठेवल्या याबद्दल  सुपरवायझर यांचा निषेध करण्यात आला .मोर्चाचे नेतृत्व जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन आयटक चे जिल्हा अध्यक्ष अमृत महाजन सचिव ममता महाजन ..तालूका अध्यक्ष वत्सला पाटील संध्या पाटील संगिता पाटील पूष्पावती मोरे  यांनी केले..या  मोर्चात अनिता सोनवणे उषा  ब्राह्मणे हिरकण कोळी चमेली पवार पंचशिला परदेशी प्यारी बारेला प्रतिभा पाटील बाई पाटील कविता पाटील रेखा पाटील पंचशिला परदेशी मिराबाई पाटील रंजना चौधरी वैशाली सोनवणे जनाबाई पावरा पारमिला बाविस्कर लताताई गवळी सूवर्णा भिल गिता बारेला आलस्तोल मोरे गिताबाई बारेला   सूनंदा पाटील आशा जाधव आदी 100चेवर कर्मचारी सहभागी झाले होते प्रसिद्ध केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.