स्वछतागृह जमीनदोस्त बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

0

आज न. पा समोर निदर्शने
भुसावळ, दि. ३० –
दिवसांपूर्वी महिला व पुरुष शौचालयांचे बांधकाम करण्यात आले होते. हे शौचालाय जमिनदोस्त झाले आहे. यावेळी सुदैवाने परिसरात कोणीच नसल्याने जिवित हानी टळली. शौचालयांची चौकशी करण्यासह नवीन शौचालये बांधण्यात यावे. पुलाचे बांधकाम करणे. नियमित पाणी पुरवठा व स्वच्छता करणे. नाले सफाई करणे, वाढीव वस्तीत पिण्याच्या पायाची नियमित व्यवस्था करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. दोषिंवर कारवाई करण्यात यावी अन्यथा दि.३१डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. न.पा. कार्यालायात निदर्शने करण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे. याबाबतच्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, शहराध्यक्ष गणेश इंगळे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, रुपेश साळुंखे, संजय सुरडकर, अरुण तायडे, बबाबाई तायडे, अरुण नरवाडे, देवदत्त मकासरे, विद्यासागर खरात, दिलीप भालेराव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.