सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली; जाणून घ्या.. जळगावातील दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जागतिक बाजारपेठेमुळे  ऑगस्ट  महिन्यात सोन्या चांदीच्या दारात प्रचंड चढ- उतार पाहायला मिळत आहे.  सोन्याच्या किंमतीत सुरू असणारी घसरण अजूनही सुरूच आहे. महिन्याचा सुरुवातीपासूनच ही घसरण सुरू आहे. तर चांदीचे दर वाढले आहेत.

जळगाव सराफ व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 47550 असून चांदीचा दर  67000 आहे.

एमसीएक्सवर (Multi commodity exchange MCX) सोन्याच्या किंमतीमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 47,223 रुपये प्रति तोळावर आहेत. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. चांदीचे दर 0.22 टक्के ने वाढल्याने 63,598 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती.

या रिकव्हरी आधी सोन्याचे दर चार महिन्याच्या निचांकी पाचळीवर अर्थात 45,600 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर गेल्यावर्षी सोन्याने 56,200 रुपये प्रति तोळाचा रेकॉर्ड स्तर गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर सोन्याचे दर 1,787.90 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत. तर चांदीचे दर 0.3 टक्के वाढीमुळे 23.89 डॉलर प्रति औंसवर आहेत. तर प्लॅटिनमच्या किंमतीत 0.1 टक्क्याने वाढ होऊन दर 1,023.52 डॉलर आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.