प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील  ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस अली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजीनगर येथील  खडकेचाळ भागात मंगल प्रताप पाटील (वय ४५) हे परिवारासह राहतात. शहरातील हॉटेल मोरोक्को स्टॉपवर खासगी वाहन चालवून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटूंबीयांनी आरडा ओरड केल्यावर शेजार्‍यांनी धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र परदेशी व बशीर तडवी हे कर्मचारी घटनास्थळ रवाना झाले. तसेच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयत मंगल पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा शुभम,  विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.