भरधाव ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नेरी नाकाकडून  वृद्ध सायकलने  घरी जात असताना जवळच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे सुरेश देविदास सोमवंशी (वय ६०) हे शिलाई मशीन रिपेअरचे काम करतात. आज सकाळी दहाच्या सुमारास ते घरून निघाले. थोड्या अंतरावरच नेरी नाका ते कासमवाडी रस्त्यावर  चिखलात त्यांची सायकल अडकली. यामुळे खाली उतरून ते सायकल बाजूला काढायला लागले. तेवढ्यातच भरधाव येणाऱ्या मनपाच्या कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर क्रमांक एमएच.१९.एपी.७३३० च्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले. मयत सुरेश देविदास सोमवंशी यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात  शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.