सेन्सेक्सच्या टॉप -6 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली

0

नवी दिल्ली 

मागील  आठवड्यात शेअर  बाजारात सतत चढ-उतार झाल्यानंतर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी  6 कंपन्यांची एकत्रित मार्केटकॅप 92,147.28 कोटी रुपयांनी घसरली आहे. या आठवड्यात टीसीएस  आणि रिलायन्स इंडस्ट्रीज  सर्वात जास्त नुकसान झाले आहेत. या कंपन्यांव्यतिरिक्त इन्फोसिस, एचयूएल, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय या कंपन्यांच्या बाजारपेठेतही घसरण दिसून आली.  याशिवाय एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे बाजार मूल्य वाढले.

या आठवड्यात टीसीएसची मार्केटकॅप 43,574.83 कोटी रुपयांनी घसरून 11,86,563.20 कोटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 35,500.88 कोटी रुपयांनी घसरण झाली असून ते 13,14,293.35 कोटी रुपयांवर गेले आहेत. या काळात हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केटकॅप 9,139.9 कोटी रुपयांनी घसरून 5,75,555.28 कोटी आणि इन्फोसिसची मार्केटकॅप 1,981.5 कोटी रुपयांनी घसरून 6,65,930.24 कोटी रुपयांवर गेली.

त्याशिवाय आयसीआयसीआय बँकेची मार्केटकॅप 1,102.33 कोटी रुपयांनी घसरून 4,42,302.42 कोटी रुपये तर एसबीआयची मार्केटकॅप 847.84 कोटी रुपयांनी घसरून 3,78,046.54 कोटी रुपयांवर गेली.

या ट्रेंडच्या उलट, एचडीएफसी बँकेची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात 11,689.01 कोटी रुपयांनी वाढून 8,30,002.67 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्सची मार्केटकॅप 8,332.62 कोटी रुपयांनी वाढून 3,70,380.58 कोटी रुपयांवर गेली. एचडीएफसीची मार्केटकॅप 3,909.44 कोटी रुपयांनी वाढून 4,50,850.54 कोटी रुपये झाली आणि कोटक महिंद्रा बँकेची मार्केटकॅप 763.21 कोटी रुपयांची वाढ होऊन ती 3,41,000.47 कोटींवर गेली.

सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्र बँक यांचा क्रमांक लागतो. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 98.48 अंक किंवा 0.18 टक्क्यांनी घसरला.

Leave A Reply

Your email address will not be published.