सुख तुमच्यासोबत ऑनलाईन आहे, तुम्ही त्याला ऑफलाईन शोधू नका: महेश अंचितलवार

0

शेंदुर्णी, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धी शेंदुर्णी सेकं. एज्यू सोसा. लि आणि आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव  गरुड स्मृती व्याख्यानमाला  वर्ष १३ चे तीसरे पुष्प औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध वक्ते महेश अंचितलवार यांनी ‘सुख ऑनलाईन आहे’ या विषयावर गुंफले.

एकविसाव्या शतकात सुखाच्या व्याख्या वेळोवेळी बदलत असताना दिसून येतात. सुखाच्या शोधात आज माणूस माणसापासून दूर जात आहे. कोरोनामुळे अनेक जवळची माणसे दुरच्या प्रवासाला निघून गेली, ज्यांनी जगण्याचा संघर्ष केला तेच आज जिवंत आहे. संघर्षाशिवाय यश नाही. कोरोनाने माणसाला संघर्ष करायला शिकवले आहे. आजच्या स्पर्धेत धावताना माणूस कशासाठी धावतोय हेच तो विसरून गेलाय. माफी मागायला आणि माफ करायलाच आज  माणूस विसरला आहे. छोट्या मोट्या गोष्टीसाठी इतरांना धन्यवाद करायची लाज वाटते आहे. प्रत्येक लहान सहान गोष्टीत आनंद आहे तो शोधून व्यक्त करता आला पाहिजे, म्हणजेच सुख ऑनलाईन आहे आणि आपण त्याला ऑफलाईन शोधण्यात वेळ घालवत आहेत, लोक चारी बाजूने नाव ठेवतात म्हणून जगायचे कसे हे आपणच ठरवावे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते महेश अंचितलवार, धी शेंदुर्णी सेकं. एज्यू सोसा. चे अध्यक्ष संजय  गरुड, सचिव सतिष चंद्र काशिद, राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेचे तज्ञ संचालक उत्तमराव थोरात, धी शेंदुर्णी एज्यू. संस्थेचे संचालक सागरमल  जैन, आचार्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. उज्वलाताई काशिद, आचार्य गरुड प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कैलास देशमुख, देवश्री काशिद, शेंदुर्णी एज्यु सोसाचे संचालक अभिजित काशिद, सामाजिक कार्यकर्ते गोविंद अग्रवाल, रा  दे निकम सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रमुख वक्ते महेश अंचिंतलवार यांचा सत्कार त्यांचे शेंदुर्णीचे मित्र अँड. देवेंद्र पारळकर यांनी केला. डॉ. प्रशांत देशमुख यांनी व्याख्यानमाला आयोजन भूमिका मांडली व सदर वैचारिक मेजवानीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय व सूत्र संचालन डॉ. योगिता चौधरी, तर आभार मुख्याध्यापक संजय उदार यांनी मानले.  व्याख्यानमालेसाठी पंचक्रोशितील व्याख्यानप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.