यावल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फ तहसिलदारांना निवेदन

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये काही विकृत मनोवृत्तीने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांची विटंबना करण्याची घटना कर्नाटक राज्यात घडते आणि तेथील सरकार डोळेझाक करते ही घटना दुर्दैवी आहे. अशा विकृत प्रवृत्तीवर तात्काळ कारवाई आवश्यक आहे.  तसे न होता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान करून शिवभक्तांच्या भावनांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे या घटनेचे तीव्र निषेध आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विकृतावर कठोर शासन करावे अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त केले.

यावेळी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, विजय पाटील, देवकांत पाटील, करीम मनियार, राकेश कोलते, बोदडे नाना, कामराज घारू, गुणवंत नीळ,  प्रतिभा नीळ, पितांबर महाजन, बापू जासूद, आयुब खान, दत्त कडु पाटील, नरेंद्र पाटील, भगवान बर्डे, निवृत्ती धांडे, अशोक भालेराव, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, विनोद (सोनू) पाटील, फारुख मुंशी, भागवत अटवाल, विजय साळी, नीलिमा धांडे, आरिफ खान, नंदा गोपाल महाजन, किरण पाटील, मोसिन खान, गणेश तायडे, हितेश गजरे, गोपाल काकडे, दीपक पाटील, विलास येवले, तुषार येवले, सविता चौधरी, ममता आमोदकर, निलेश आमोदकर, मगदूल तडवी, सागर शिंदे, गणेश तायडे, लकडु सिंग बारेला, भूषण खैरे, पवन पाटील, विशाल वाणी यांच्यासह आदी  कार्यकर्ते उपस्थित  होते.

Leave A Reply

Your email address will not be published.