सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली

0

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ( सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बफरला हार्बर मार्गावरील लोकल धडकल्याची घटना आज ११.३० च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने लोकलचा वेग धीमा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. सुदैवाना सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

आज दुपारी बाराच्या सुमारास पनवेलवरुन येणारी ट्रेन सीएसएमटी स्थानकात पोहोचली. प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे ही ट्रेन येत होती. प्लॅटफॉर्मच्या शेवटी सुरक्षेच्या दृष्टीने बफर लोकल बफरला धडकल्यानंतर बसलेल्या झटक्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या अपघातामुळे हार्बर मार्गारील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.