निवडणुकीचा असाही फायदा : एसटी महामंडळाला भाड्यापोटी मिळाले दीड कोटी रुपये

0

जळगाव : लोकसभेच्या निवडणुकीमुळे जळगाव एसटी महामंडळ विभागाला तब्बल १ कोटी लाख ५७ लाख रुपयांचे भाडे मिळाले आहे. निवडणुकीत मतपेट्या ने-आण करण्यासाठी महामंडळाच्या जळगाव विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला ४३५ बसेस दिल्या होत्या. या बसेसच्या भाड्यापोटी महामंडळाला १ कोटी ५७ लाख रुपये मिळाले असून यात सर्वाधिक जळगाव आगाराला २६ लाख ६० हजार ४१२ रुपये इतके भाडे मिळाले आहे.तर सर्वांत कमी ९ लाख ८४ हजार ४७४ इतके भाडे चोपडा आगाराला मिळाले आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा मतपेट्या वाहतुकीत महामंडळाला एका दिवसात दुप्पट उत्पन्न मिळाले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी एस. टी. महामंडळाच्या जिल्हाभरातील ११ डेपोंमधून ४३५ बसेसची नोंदणी जिल्हा निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. २२ रोजी मतपेट्या पोहचविण्यासाठी सकाळी आठपासूनच या बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. तसेच २३ रोजीदेखील मतपेट्या आणण्यासाठी या बसेस दुपारी तीन पासूनच निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. ४३५ बसेसच्या भाड्यापोटी निवडणूक विभागाने महामंडळाच्या जळगाव विभागाला १ कोटी ५७ लाख रुपयांचा धनादेश महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाकडे महामंडळाकडून दोन दिवस ६० बसेस पुरविण्यात आल्या होत्या. यांचे भाडे १७ झाले असून, ते भाडेदेखील महामंडळाला लवकरच मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.