पंतप्रधान मोदींचा’अभिजीत मुहूर्ता’वर उमेदवारी अर्ज दाखल

0

वाराणसी : लोकसभा निवडणूकसाठी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज (२६ एप्रिल) शुभ ‘अभिजीत मुहूर्ता’वर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधानांनी शुक्रवारी ११.३० वाजता वाराणसी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदींनी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाराणसीच्या पंडितांनी शुभ मुहूर्त काढला होता. यानुसार, दिवस, तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली.

मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वाराणसीतल्या काळभैरव मंदिरात पूजेसाठी दाखल झाले. इथं त्यांनी मंदिरात पूजा-अर्चना केली. यानंतर दते वाराणसीच्या गल्ल्यांमधून लोकांच्या भेटी घेत घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेत्यांसोबत एनडीएचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. भाजप नेत्या सुषमा स्वराज, भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहिलेत. त्याचसोबत  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवानही उपस्थित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.