सिंधुताई सपकाळ यांना बजरंग सेना अमरावतीतर्फे श्रद्धांजली

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

थोर समाजसेविका व अनेक अनाथांची माय असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ या वयाच्या 75 व्या वर्षी, हृदयविकाराने सर्वांना पोरके करून अनंतात विलीन झाल्या. ही बातमी समजताच अनेकांचे अश्रू अनावर झाले. या दुःखद प्रसंगी 5 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांना बजरंग सेना अमरावती जिल्हा यांच्या वतीने अमरनगर येथील राम मंदिर परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन शोकसभा घेण्यात आली.

यावेळी बजरंग सेना अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने, भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहसंयोजक विठ्ठल चौधरी, बजरंग सेना महामंत्री प्रज्वल वरुडकर, संघटन मंत्री राज सगणे, आदींनी सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करून शेवटी सामुदायिक शब्दांजलीने शोकसभेची सांगता करण्यात आली.
या शोकसभेचे संचालन आदित्य देशमुख यांनी केले. यावेळी बजरंग सेना युवा मोर्चा शहराध्यक्ष दर्शन भुयार, अमरनगर शाखाप्रमुख पवन मोहोकार, लक्ष्मीनगर प्रभाग अध्यक्ष गिरीश हाडोळे, करण नलगे, प्रथमेश पाटील, करण टोपमोरके, ऋषभ जोंधळे, तुषार इंगळे, परमेश्वर सोनाने, रवी वैरागडे, संतोष शिंदे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.