चिंताजनक.. आज जिल्ह्यात तब्बल ८८ कोरोना बाधित रुग्ण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढतच आहे. आज जळगाव जिल्ह्यात तब्बल ८८ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जळगाव शहरासह भुसावळात देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वात जास्त खबरदारी घेणे  आवश्यक आहे.

जळगाव शहरात ३१, भुसावळ २४, चोपडा २७, यावल २, रावेर १, चाळीसगाव ३ असे एकूण ८८ रुग्ण आढळले आहेत.

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला असून भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. तर महाराष्ट्रात देखील या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या २०३ आहे. तर एकाने कोरोनावर मात केलीय. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.