सार्वजनिक ठिकाणी पिस्तुलाने दहशत करणाऱ्यांवर कडक कारवाई आवश्यक

0

जळगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या न्यू महेंद्र ढाब्यावर रविवारी रात्री १०: ३० चे सुमारास राजकारण्यांच्या दोन गटात झालेला राडा अत्यंत गंभीर आहे. सार्वजनिक ठिकाणी ढाब्यावर दोन गटांमध्ये झालेला हा राडा सिनेस्टाइल असा होता. त्यामध्ये भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी , जळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक भगत बालाणी  यांचा समावेश होता. विशेषतः अनिल चौधरीचा समर्थक मित्र केदारनाथ सानप यांच्याकडे पिस्तूल होते. त्यांनी परवाना काढून पिस्तूल मिळविले असले तरी त्याचा वापर सार्वजनिक ठिकाणी दाखवून दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा परवाना दिला नाही. 

स्वरक्षणासाठी त्याचा क्वचितप्रसंगी योग्य असा उपयोग केला पाहिजे. परंतु न्यू महेंद्र ढाब्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारली आणि एक खुर्ची पडल्याने समोरच्या गटाला राग येऊन त्याचे रूपांतर वादावादीत झाले. तरीपण मी समजासमजव केली. वाद नव्हताच समजूत मात्र घातली. तरीसुद्धा माझे नाव गुन्ह्यात दाखल असे म्हणणाऱ्या अनिल चौधरींच्या समर्थक मित्रांनी पिस्तूल का काढली ? नुसती पिस्तूलच काढ़ली नाही तर  ती काढून एकाच्या डोक्याला लावल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेय. जेव्हा सानपने पिस्तूल काढले तेव्हा दोन गटात चाललेल्या राड्यात त्याच्या हातात पिस्तूल आहे असा आवाज ऐकायला येतोय . तेव्हा वादावादीत पिस्तूल काढण्यापर्यंत मजल गेली असतानासुद्धा समज-गैरसमज झाला . 

समजासमजव केली असे म्हणजे स्वतः सारवासारव करण्याचा प्रकार नव्हे काय ? सदर ढाब्यावर सार्वजनिक ठिकाणी अनेकजण जेवायला बसलेल्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार नव्हे काय ? हा सिनेस्टाइल राडा चालला असताना ढाब्याच्या चालकासह सर्वजण अवाक होऊन पाहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकले नाहीत. कारण पिस्तुलाचा त्यांना धाक असावा . हॉटेल चालकांनी किमान या प्रकारासंदर्भात पोलिसांना कळविणे आवश्यक होते. परंतु तेवढे साधे कर्तव्यसुद्धा हॉटेल चालकांनी केले नाही . अन्यथा त्यावेळी घटनास्थळी पोलीस पोहचले असते तर दोन्ही गटांच्या लोकांवर वेगळीच कारवाई होऊ शकली असती . ढाब्यावर पिस्तूल काढून राडा कारवाई दोन्ही गटातील लोक राजकारणाशी संबंधित असल्याने रविवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर सोमवारी सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. असा राडा करणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य लोक असते तर हा तर फार महत्वाचा म्हणता येईल. रविवारच्या घटनेनंतर सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली त्याबद्दल एमआयडीसी पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करायची ,प्रकरण अंगाशी येतेय असे दिसताच सारवासारव करायची,आपसात समजोता झाला , कोणाचीही तक्रार नाही.

आपसात वाद मिटला अशी शेखी मिरवायची असे चालणार नाही हेच पोलिसांनी दाखवून दिले. गुन्हा दाखल झाल्यावर माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नसतांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असे म्हणणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे ‘ अशातलाच प्रकार होय. पिस्तूल काढणारा केदारनाथ सानप या ढाब्यावर जेवायला कुणाबरोबर आला होता ,ते कुणाचे मित्र आहेत याची पोलिसांना कल्पना नाही काय ?  केदारनाथ सानप यांनी अशा सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल काढून कायद्याचा दुरुपयोग केला आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर चौकशी करून सदर पिस्तूल जप्त करून त्याचा परवाना रद्द केला पाहिजे. पोलिसांनी सानपवर कठोर कारवाई केली नाहीतर त्याची हिंमत आणखी वाढेल. आणि त्या पिस्तुलाचा आणखी दुरुपयोग होईल हे विसरता कामा नये . त्याचबरोबर अनिल चौधरी भुसावळचे माजी नगराध्यक्ष आहेत. 

त्यांनी मित्राची बाजू घेऊन खोटी सारवासारव केली म्हणून तेही या राड्याशी तितकेच जबाबदार नाहीत काय ? न्यू महेंद्र ढाब्यावर झाले त्या राजकारण्याच्या दोन गटातील आणखी एक प्रमुख व्यक्ती म्हणजे जळगाव महानगरपालिकेचे गटनेते भगत बालाणी हे होय. माझा या घटनेशी काहीही संबंध नाही . नुसती मध्यस्थी केली तरी मला विनाकारण गोवले असे म्हणणारे भगत बालाणी यांनी या गुन्ह्यातून  सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. जेवणाची पार्टी कुणासाठी ,कोणी दिली होती याचा पोलिसांनी तपास करावा . पिस्तूल काढणारा केदारनाथ सानप भगत बालाणीच्या गटाचा होता कि दुसऱ्या गटात ? तेव्हा या घटनेशी माझा संबंध नाही . मी मध्यस्थीची भूमिका बजावली म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही . पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करूनच थांबू नये. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करावा. अन्यथा राजकारणाचा आडपडदा घेऊन गुन्हेगारी कृत्य वाढत जाईल यात शंका नाही.

चांगभलं
– धों.ज.गुरव

 

Leave A Reply

Your email address will not be published.