जळगाव / पुणे : आज जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये आहे. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये आहे.
कोल्हापूरचा विचार केला तर आज सोन्याचा भाव 51 हजार 100 रुपये प्रति तोळा आहे. चांदीचा विचार केला तर मात्र पुण्यापेक्षा जळगावात चांदी खरेदी करणं स्वत: ठरेल. कारण, पुण्यात चांदीची किंमत प्रति किलो 65 हजार रुपये इतकी आहे. तर जळगावात चांदीला 67 हजार 506 रुपये प्रति किलो इतका दर आहे. तिकडे कोल्हापुरात चांदी 64 हजार रुपये प्रति किलो आजचा दर आहे.
मुंबईतील सोन्याचा दर
मुंबईतील सोने आणि चांदीच्या दराचा विचार केला तर मुंबई आज सोने प्रति तोळा 49 हजार 320 रुपये आहे. काल हेच सोनं 10 रुपयांनी स्वस्त होतं. गेल्या 10 दिवसातील मुंबईतील सोन्याचा दराचा विचार केला तर मुंबईत सोन्याच्या किमतीत चढउतार राहिला असला तरी फारसा फरक पडलेला दिसत नाही.
दिल्लीतील सोन्याची किंमत
दिल्लीचा विचार केला तर दिल्लीत सोनं महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं महाग आहे. दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 52 हजार 760 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 360 रुपये प्रति तोळा आहे. गेल्या 10 दिवसांचा विचार केला तर दिल्लीत सोन्याचे दर 400 रुपयांनी कमी झाले आहेत.