भातखंडे शाळेतील ध्येय वेडा कलाशिक्षक संदीप पाटील

0

भातखंडे( प्रतिनिधी) : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील उत्साही ध्येय वेडा  कलाशिक्षक संदीप पाटील गिरडकर यांनी यांनी दोन वर्षांपूर्वी संपूर्ण शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी केली होती.

तदनंतर शाळेच्या समोरील भाग देखील वेगवेगळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक बोध होण्यायासाठी चित्र रंगवले होते. यातूनच विद्यार्थ्यांना चालता-बोलता शिक्षण मिळत आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी शाळेच्या संपूर्ण वर्गखोल्या आतून बोलक्या करण्याचे ठरवले असून यातूनच चालता-बोलता विद्यार्थी शिक्षण घेतील आणि शाळेविषयी त्यांना लळा लागेल असे त्यांना वाटते.

याबरोबरच ते कार्यानुभव कला या विषयाच्या माध्यमातून या प्रकारात संगीत वाद्य च्या माध्यमातून ढोलकी वरून  विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण  देण्याचे काम  ते सातत्याने करत असतात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभिनव शैक्षणिक उपक्रमास संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील संस्थेचे संचालक प्रशांत विनायक पाटील संस्थेच्या सचिव डॉ. पुनमताई प्रशांत पाटील यांनी प्रेरणा दिली असून या प्रेरणेतूनच ते अधिक प्रभावी झाले असून या कामासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील सह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पाठबळ व सहकार्य लाभत आहे अशा बहुआयामी गुणी कला शिक्षकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.