सलग पाचव्या दिवशी पेट्रोल–डिझेलच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.  आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे.

कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला असता सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आजच्या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२९ रुपये आणि डिझेल ७७.९० रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५९ रुपये असून डिझेल ७१.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.६४ रुपये असून डिझेल ७६.८८ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.१५ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.९८ रुपये प्रती लीटर झाले आहे.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.