सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे दर घसरले, ‘हा’ आहे आजचा नवीन दर

0

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत गुरुवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या. त्यामुळे भारतात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. दिल्ली बुलियन बाजारात 10 डिसेंबर 2020 रोजी सोन्याच्या भावात आज प्रति 10 ग्रॅम 534 रुपयांची घट झाली आहे.

 

त्याच बरोबर चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. एक किलो चांदीची किंमत 628 रुपयांनी घसरली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 49,186 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो, 63,3333 रुपये होता. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरण झाल्यामुळे भारतातही सोन्या-चांदीच्या किंमतीही घट नोंदवली गेली आहे.

 

सोन्याचे नवीन दर

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 534 रुपयांची घट झाली. राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 48,652 रुपये झाली आहे. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 49,186 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,835 डॉलरवर आली आहे.

 

चांदीचे नवीन दर

चांदीबद्दल बोलताना गुरुवारीही त्यात घट नोंदली गेली. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत 628 रुपये प्रतिकिलो घट झाली आहे आणि आता त्याची किंमत 62,711 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची किंमत प्रति औंस 23.84 डॉलरवर बंद झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.