नगर परिषदेच्या निवडणुकीत १८ जागा लढविणार शिवसेनेच्या बैठकित निर्णय

0

वरणगांव:  तालुक्यातील अगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दिनांक ९ डिसेंबर रोजी शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना,वरणगाव शहर ची महत्त्वपूर्ण बैठक मोठे  विठ्ठल मंदिर,वरणगाव येथे संपन्न झाली.

बैठकीत  नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांतजी पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण १८ जागांवर लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समस्त शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

मागील पंचवार्षी निवडणुकीत शहरात भाजप नंतर शिवसेनेकडे पहिल्या क्रमांकाचे जनमत होते व भाजपचे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने समस्त हिंदुत्ववादी मते शिवसेनेकडे येणार असल्याचे विश्लेषण नोंदवण्यात आले.

इच्छुक व सक्षम उमेदवारांची संख्या जास्त असल्याने तसेच वरणगाव राष्ट्रवादी कडून जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून सततच्या १८/० च्या होणाऱ्या वल्गना व एकनाथ खडसेंचे विस्तारवादी व एकल धोरण लक्षात घेता पूर्ण १८ जागांवर शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.

वरील प्रमाणे सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या भावना वरिष्ठांकडे मांडणार आहोत.

सदर बैठकीत शिवसेना शहरप्रमुख रवींद्र सुतार,माजी तालुकाप्रमुख संजीव कोलते,शिवसेना माजी सरपंच सुशील जंगले,माजी उपतालुकाप्रमुख महेंद्र शर्मा,शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष अतुल शेटे, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी,माजी ग्रा.पं  सदस्य गोविंद मांडवगणे,जितेंद्र देवघाटोळे,युवासेना जिल्हाप्रमुख ॲड.चंद्रकांत शर्मा,शिवसेना उपशहरप्रमूख सुनील भोई,तुषार चौधरी,प्रशांत पाटील,सुकदेव धनगर,प्रसिद्धीप्रमुख शिवा भोई,ग्रा.सं.क चे दिगंबर चौधरी,विभागप्रमुख संजय कोळी,रामा शेटे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.