धरणगाव येथे राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे स्वच्छता अभियान

0

धरणगाव_शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दिनांक 1 ते 15 डिसेंबर दरम्यान १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रवीण धिमण यांच्या आदेशान्वये बटालियन चे कार्यक्षेत्रात राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे स्वच्छता अभियान यासह  स्वच्छ भारत अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.

 

१८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव यांच्या नियोजनानुसार येथील पी आर हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मधील छात्र सैनिकांनी आज विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले यावेळी मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे यांनी स्वच्छता ,पाणी आडवा पाणी जिरवा आदी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कोरोणा चे बाबत काळजी घेण्याचे आव्हाहन केले.

छात्र सेने तर्फे स्वच्छ भारत पंधरवाडा साजरा केला जात आहे.

या छात्र सैनिकांना मेजर डॉ. अरुण वळवी, चीफ ऑफिसर डी एस पाटील यांनी मार्गदर्शन केले स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या पंधरा दिवसात विद्यार्थ्यांना हात धुणे,बागबगीचे मध्ये साफसफाई करणे,महापुरुष यांचे पुतळे धुणे,परिसर स्वच्छ करणे ,वेस्ट प्लास्टिक आणि प्लास्टिक चा वापर करू नये यावर सेमिनार, भितीपत्रिका, चित्रकला,’ स्वच्छ भारत अभियान ‘ यावर निबंध स्पर्धा, आरोग्य आदी विविध विषयावर उपक्रम स्पर्धा घेतल्या जाणार आहेत स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात सिनियर ज्युनिअर डिविजन ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कोरोना बाबत शासनाचे सर्व नियम ,आदेश ,सूचनांचे पालन करून ,सामाजिक अंतर ठेऊन ,मास्क चा वापर करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

एन सी सी कॅडेट लॉक डाऊन काळात देखील सामाजिक उपक्रम राबवित आहेत याबद्दल नागरिकांनी कॅडेट चे कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे,सचिव डॉ मिलिंद डहाळे,संचालक अजय पगारिया,मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे,प्राचार्य डॉ टी एस बिराजदार,उपप्राचार्य डॉ किशोर पाटील,उपमुख्याध्यापक रामचंद्र सपकाळे,पर्यवेक्षिका श्रीमती आशा सपकाळे आदींनी कॅडेट स् चे अभिनंदन केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सिनियर ज्युनिअर डिविजन चे एन सी सी कॅडेट यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.