सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर पुन्हा महागला ..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्या जनतेच्या खिशाला फटका बसत आहे.   त्यातच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉरपोरेशनने (IOC) सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. परिणामी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 859.5 रुपये झाले आहेत. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर  834.50 रुपये इतके होते. सध्याच्या  कोरोना सारख्या गंभीर महामारीच्या काळात अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असताना वाढणारी महागाई चिंतेची बाब बनत आहे.

दिल्लीमध्ये  14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर आता 859.5  रुपये झाला आहे. याआधी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 834.5 रुपयांना मिळत होते.  तर मुंबईत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर 859.5 रुपये झाला आहे. आधी मुंबईत एलपीजी सिलिंडर 834.50 रुपयांना मिळत होते. तर कोलकात्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर 861 रुपयांवरून वाढून 886 रुपये झाला आहे.

तसेच सर्वसाधारणपणे पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल करत असते. यावर्षाच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारी 2021 मध्ये दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात वाढ होत गॅस सिलिंडरचे दर 719 रुपये झाले होते. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती आतापर्यंत 165.5 रुपयांनी सातत्याने वाढल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.