देवाचा हिस्सा मागण्यावरून मुलाकडून वृध्द आईवडीलांना मारहाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात वयोवृध्द आईवडीलांना घरातील देवाचा हिस्सा मागण्यावरून  मुलाने वडीलांना दगड मारला तर आईला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदा सदाशिव पाटील (वय ६८) आणि लताबाई आनंदा पाटील (वय ५९) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आनंदा पाटील यांचा मोठा मुलगा रविंद्र आनंदा पाटल रा.सम्राट कॉलनी याने काल मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आईवडीलांच्या घरी जावून ‘मला देवाचा हिस्सा दे’ असे, म्हणून वडील आनंदा पाटील यांना हातात घेवून दगड मारला.  यात ते गंभीर जखमी झाले. तर आई लताबाई यांना शिवीगाळ केली. तर दोघांना शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

जखमीवस्थेत आनंदा पाटील यांनी प्राथमोपचार घेवून काल १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वृध्द आईवडीलांना मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रविंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.