सरकारची मोठी कारवाई; 20 यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारत सरकारने सोमवारी देशविरोधी प्रचार करणाऱ्या 20 युट्यूब चॅनल्स वर बंदी घातली आहे. आयटी कायद्यात नुकत्याच समावेश करण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. या युट्युब चॅनलसह 2 वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानंतर युट्युबने ही कारवाई केली असली तरी, या कारवाईबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

IT कायदा 2021अंतर्गत करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या कारवाईत 20 यूट्यूब चॅनेलशिवाय दोन वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली. दरम्यान काही रिपोर्टनुसार, ही सर्व 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सही पाकिस्तानमधून  चालवल्या जात होत्या.

सरकारी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, हे चॅनेल आणि वेबसाइट्सवर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या मदतीने भारतविरोधी प्रचार केला जात होता. अधिका-यांनी सांगितले की, या चॅनलमध्ये ‘नया पाकिस्तान’ नावाचे एक चॅनेल होते ज्याचे सुमारे 20 लाख सबस्क्रायबर्स होते. हे चॅनल्स कृषी कायद्यांच्या विरोधात आणि अयोध्येपासून काश्मीरपर्यंत खोट्या बातम्या पसरवत होते.

आयटी कायद्यानुसार, आणीबाणीच्या काळात पहिल्यांदाच स्पेशल पावर्सचा वापर करत या चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या चॅनल्स पैकी 15 चॅनल हे ‘नया पाकिस्तान’ ग्रूपच्या मालकीचे आहेत. या चॅनेलवर पब्लिश झालेले काही व्हिडिओ कलम 370, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर वर चालून येत असलेले तालिबानी फायटर्स या संबंधीत होते. या व्हिडिओंना 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.