सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? ‘महासेनाआघाडी’च्या नेत्यांनी मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ !

0

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हं दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ‘महासेनाआघाडी’ सत्तास्थापनेचा दावा करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितल्याची माहिती आहे. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तिन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

या भेटीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा दावा करणार की अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबत मागणी करणार, हे समजलेलं नाही. भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच सकाळी याबाबत राज्यपालांची भेट घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.