अखेर भडगाव तालुक्यात बंद ९ बस फेऱ्या सुरु !

0

दैनिक लोकशाही वृत्ताची दखल 
भडगाव (प्रतिनिधी) : भडगावच्या ९ बस फेऱ्या बंद केल्याने विदयार्थ्यांची गैरसोय, या आशयाचे वृत दै. लोकशाहीने यापुर्वी व दि. १३ रोजीही प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पाचोरा आगाराने तात्काळ भडगाव बसस्थानकातुन तालुक्यात गावोगावी जाणार्या एकुण ९ बसफेर्या अखेर दि.१३ रोजी सकाळपासुन सायंकाळी उशीरापर्यंत सुरु करण्यात आल्या आहेत. अशी माहीती भङगाव बसस्थानकाचे वाहतुक नियंञक राजु चौधरी, वाहतुक नियंञक राजु भङांगे यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली. तालुक्यातील शाळा सुटीच्या काळात  १८ ते १९ दिवस बंद असलेल्या ९ बससेवा पुर्ववत सुरु झाल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त करुन दै. लोकशाही चे आभार मानले आहेत.

याबाबत माहीती अशी कि, शाळांना सुटया लागताच पाचोरा आगाराने नेहमीप्रमाणे तालुक्यातील ९ बस फेर्या बंद केल्या होत्या. १८ ते १९ दिवस काही गावांच्या ९ बसफेर्या बंद केल्या होत्या.यात वाङे, निंभोरा, कोळगाव, उञाण,निंभोरा, कोळगाव, नालबंदी यासह ९ बस फेर्या बंद होत्या.प्रवाशांचे प्रवासासाठी अतोनात हाल झाले होते. शालेय सुटया संपल्या.शाळाही सुरु झाल्या  पाचोरा आगाराने भङगाव तालुक्यात बंद केलेल्या बस फेर्या पुर्ववत सुरु केल्या नव्हत्या.  अनेकदा अचानक काही बस फेर्याही बंद करण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे प्रवाशी, विदयार्थी, विदयार्थीनींचे प्रवासासाठी हाल होत होते.  प्रवाशीवर्गातुन एस. टी. महामंङळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत होती. दै. लोकशाही ने पुन्हा दि. १३ रोजी भङगावच्या ९ बस फेर्या बंद केल्याने विदयार्थ्यांची गैरसोय असे वृत्त प्रसिद्ध केले . या वृत्ताची पाचोरा आगाराने तात्काळ दखल घेत दि. १३ पासुन तालुक्यात बंद असलेल्या ९ बस फेर्या सकाळपासुन राञी उशीरापर्यंत  पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.  प्रवाशांची प्रवासाची मोठी सोय झाली आहे. बसस्थानकात दिवसभर शालेय विदयार्थी, प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी दिसुन आली. माञ पाचोरा आगाराने सर्व बस फेर्या सुरळीत सुरु ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गातुन जोर धरीत आहे. प्रवाशी वर्गासह विदयार्थी, विदयार्थीनींनी दै. लोकशाही व एस. टी. महामंङळाचे आभार मानले आहेत. तसेच भङगावहुन वाङे येथे राञी मुक्कामी बस फेरी बांबरुङ प्र. ब. गावातुन सुरु करावी. अशी मागणी  बांबरुङ ग्रामपंचायतीसह नागरीकांची आहे. तसेच भङगाव याकङे तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.