रेल्वेतील चहा, नाश्ता आणि जेवण महागणार ; जाणून घ्या दर

0

नवी दिल्ली  : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण रेल्वे प्रवासादरम्यान चहा, नाश्ता आणि जेवणावर आता प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या अन्न व पेय विभागाच्या संचालकांकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ज्यात राजधानी शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट घेताना चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागतात. तिकीट सिस्टिममध्ये नवे पदार्थ आणि दर येत्या 15 दिवसांमध्ये अपडेट होतील. तर चार महिन्यांनंतर हे नवे दर लागू करण्यात येतील.

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी ट्रेनमध्ये लागू करण्यात आलेले नवीन दर सेकंड क्लासमधील प्रवाशांसाठी चहा १० रुपयांऐवजी २० रुपये, स्लीपर क्लास १५ रुपये, दुरांतो एक्सप्रेस स्लीपर क्लासमध्ये पूर्वी नाश्ता आणि जेवण ८० रुपयांना मिळत होतं. ते आता १२० रुपये झालं आहे. तर संध्याकाळचा चहा २० रुपयांऐवजी ५० रुपये होणार आहे.

राजधानी एक्सप्रेस फर्स्ट क्लासमध्ये पूर्वी जेवण १४५ रुपयांना होतं त्याचे नवीन दर २४५ रुपये असणार आहेत. त्यामुळे या नवीन दराचा फटका सर्वसामान्यांना होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त असणाऱ्या एक्सप्रेस, मेलमध्ये शाकाहारी जेवण पूर्वी ५० रुपयांना मिळत होतं त्यासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने एग्ज बिरयानी ९० रुपये, चिकन बिरयानी ११० रुपये मोजावे लागणार आहेत.

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस फर्स्ट एसी क्लास दर

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस सेकंड आणि थर्ड एसी क्लास दर

इतर मेल/एक्स्प्रेचे दर

Leave A Reply

Your email address will not be published.