पाचोरा शहरात मोकाट कुत्रे व जनावरांचे थैमान !

0

नगरपालिका प्रशासनाचे कुंभकर्णी झोपेचे सोंग

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरात रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट कुत्रे, जनावरे यांनी थैमान घातले असुन शहरातील व बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघातही होवुन नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पाचोरा नगरपालिकेची भुयारी गटारीची योजना कार्यान्वित असुन त्याच सोबत जळगांव – चांदवड या महामार्गाचे देखील काम सुरु आहे. यामुळे शहरातील व शहराबाहेरुन जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड अशी ट्राॅफीक होत असुन त्यातच अजुन एक विघ्न म्हणजे शहरात असलेली मोकाट कुत्रे व जनावरे यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून आपला प्रवासाचा पल्ला गाठावा लागत आहे. शहरातील बाह्यमार्गावरुन भडगाव कडुन जळगांव जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाचे काम सुरू असुन जारगांव चौफुलीवर मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा व गुरांचा वावर असतो. याठिकाणी वाहन चालकांना अतिषय जिकरीने वाहन चालवावे लागते. तसेच शहरात देखील भुयारी गटारीचे काम कार्यान्वित असुन काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आहे त्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. शाळकरी मुले, वृध्द व महिलांना रस्त्यांवरुन जाणे धोकेदायक झाले आहे.

नागरिकांना रस्त्यांचा त्रास, कुत्र्यांचा त्रास व मोकाट जनावरांचा त्रास अशा तिहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाबींकडे नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देवुन मोकाट कुत्रे व जनावरे यांचे बाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.