शिंदाड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था !

0

पाचोरा : तालुक्यातील शिंदाड परिसरतील रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून वाहन धारक त्रस्त झाले आहे.

शिंदाड परिसरातील रस्ते हे सततच्या पावसामुळे पूर्ण पने खराब झाले आहे.  शिंदाड लागून असलेल्या पिंपळगाव हरे,पिंप्री ,वाडीशेवाळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहे सर्वत्र डांबर निघाले असून वाहने चालवणे देखील अवघड झाले आहे. तसेच वाडी ते शेवाळे दरम्यानचा पूलावर मोठे खड्डे पडले असून थोडे जरी पाणी आले तरी रस्ता पूर्ण पने बंद होत असतो सदर पुल हा केव्हाही तुटुन जाऊ शकतो व मोठा अपघात होऊ शकतो.  त्या मुळे सादर पुलाची उंची वाढून दुरुस्ती करण्यात यावी व परिसरातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी वाहन धारकांना कडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.