संपाच्या तणावातून ST चालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

0

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात एसटी महामंडळाचा संप  चालू आहे. या संपावर राज्य सरकारकडून अजून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यातच आता एसटी विभागातील मेढा आगारातील बसचालक संतोष वसंत शिंदे यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

यामुळे राज्यातील सर्व एसटी कर्मचारी प्रचंड तणावाखाली आहेत. बसचालक संतोष शिंदे हेसुद्धा मागच्या चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. याच तणावामुळे काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.