संतापजनक.. 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विद्येचे  माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात आठ नराधमांनी मिळून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेने वानवडी पोलिसात तक्रार केली आहे.

पुण्यातील रेल्वेे स्टेशन परिसरातून आठ नराधमांनी अपहरण करत बलात्कार केला. आठ नराधमांमध्ये दोन रेल्वे अधिकारी आणि काही रिक्षाचालकाचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 ऑगस्टल पीडित तरूणी ती मुंबईला आपल्या मित्राला भेटण्यासाठी चालली होती. रेल्वे स्थानकावर आली त्यावेळी आरोपींनी, आता कोणतीही गाडी नाही, तु कशी जाणार, आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो असं सांगत तिला बाहेर आणलं आणि रिक्षामधून वानववडी परिसरात नेलं. तिथ नेल्यावर तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, हा सर्व प्रकार रविवारी उघडकीस आला असून पोलिसांनी आठही आरोपींना अटक केली आहे. पीडित तरूणी वानवडी येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिचे वडिल माळी म्हणूम काम करतात. सध्या पीडित तरूणीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी बलात्कार होत असेल तर नराधमांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही?, हा सवाल स्थानिकांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.