संजय राऊतांकडून ‘ते’ वक्तव्य मागे

0

मुंबई – माफिया डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला. यानंतर काही तासातच संजय राऊत यांनी एका पाऊल मागे घेतले. इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्याने कोणी दुखावलं गेलं असेल, तर मी वक्तव्य मागे घेतो, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, जेव्हा इंदिरा गांधींविषयी कोणी टीका टिपणी करत असे, तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र गप्प बसायचे, पण मी त्यांची बाजू उचलून धरायचो. परंतु माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहचली, असं कोणाला वाटत असेल, त्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असं म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यासंदर्भात कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्‌विट केले. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कधीच तडजोड केली नाही. मुंबई कॉंग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांच्याकडे चुकीची माहिती देणारे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो असे मिलिंद देवरा यांनी सांगितले होते. तसेच, राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम ठेवला पाहिजे असं देखील देवरा यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.