भुसावळात दीनदयालनगरातील अतिक्रमीत घरे पाडण्यास सुरुवात

0
महामार्ग चौपदरीकरणासाठी काम सुरु
भुसावळ  (प्रतिनिधी )-
 राष्ट्रीय महामार्गाच्या  चौपदरीकरणाच्या कामाला गती आल्याने या मार्गाच्या कामात अडथळा ठरणारी दीनदयालनगरातील 99 घरे गुरूवार 16 रोजी  सकाळी आठ वाजता पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात झाली. यामुळे महामार्ग वरील मार्ग अधिक मोकळा होण्याची शक्यता असून वाहतुकीमधील अडथळे दूर होतील .
         महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी बंदोबस्तात मंगळवार रोजी  मोजमाप करून जागेची आखणी केली त्यानंतर  16 रोजी घरे पाडणार असल्याची रहिवाशांना कल्पना दिली . त्यानुसार अनेकांनी बुधवारीच
 घरे रीकामी केली होती तर काही रहिवाशांच्या घरात सामान असल्याने त्यांनी गुरुवार रोजी  तो बाहेर काढला   ऐंन संक्रांतीत घरावर हातोड़ा पडून घर जमीन दोस्त झालेली पाहुन मात्र   अनेकांना गहिवरून आले.
चौघांच्या मोबदल्याबाबत संघर्ष
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दीनदयाल नगरातील 99 घरे ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने घर मालकांशी चर्चा करून त्यांना मोबदला देण्यात आला होता मात्र चंद्रकांत चौधरी यांच्यासह चौघांनी मोबदला नाकारला असून  याबद्दल न्यायालयीन लढाई सुरू आहे   गुरुवार रोजी  व्हिडिओ पंचनामा करून घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली.यावेळी
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता यावेळी  महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, आरसीपी प्लाटून, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी, डीबी पथकातील सुमारे शंभर कर्मचार्यांच्या उपस्थितीत पाच जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडण्याच्या सुरूवात करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.