‘तान्हाजी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा ; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती ‘तान्हाजी मालुसरे’ कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ही कथा आपण शालेय जीवनापासून वाचत आलो आहोत. हीच कथा अतिशय भव्यरित्या “तानाजी: द अनसंग वॉरियर” या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे.

प्रदर्शनानंतर अवघ्या सहा दिवसातच चित्रपटाने 100 कोटींची बाजी मारून ब्लॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात अजय देवगण, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे आणि सैफ अली खान अशी दमदार स्टार आहे.दरम्यान, ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा’. देशातील इतर राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे, त्यामुळे तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.