अतिक्रमण विभागातील सात कर्मचार्‍यांना शोकॉज

0
मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी केली कारवाई;दुसर्‍या दिवशीही काढले अतिक्रमण
जळगाव-शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला मंगळवार पासून महापालिका प्रशासनाने सुरवात केली. कोर्ट चौक ते गणेश कॉलनी  रस्त्यावरील 74 दुकानांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढले. दुसर्‍या दिवशी आज चार ते पाच ठिकाणी अतिक्रमण काढले तर वादग्रस्त दोन अतिक्रमण काढणे थांब विण्यात आले. तर इमारतींचे रस्त्यात येणारे ओटे काढण्याच्या सुचना महापालिकेने मालमत्ताधारकांना दिल्या आहे.दरम्यान,अतिक्रमण विभागाच्या सात कर्मचार्‍यांना कारणे  दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका प्रशासनाने पुन्हा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला  मंगळवारी सुरवात केली. पहिल्या टप्यात गणेश कॉलनी ते कोर्ट चौक या रस्त्यापासून सुरवात केली. मंळवारी 74 दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. आज दुसर्‍या  दिवशी सकाळी महापालिकेचे पथक गणेश कॉलनी रस्त्यावरील पुढील कारवाईसाठी अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. पाच-सहा ओट्याचे  अतिक्रमण काढण्यात आले.
दोन इमारतींचे ओट्यांचे अतिक्रमण
कारवाई प्रसंगी महापालिकेचे नगरचना विभागाचे अभियंते उपस्थित होते. यावेळी रस्त्यांची लांबी मोजतांना दोन इमारतींचे साईड मार्जीन (रस्त्याला लागून) अतिक्रमीत  ओटे आढळून आले. यावेळी मालमत्ताधारकांना संबधीत अतिक्रमण स्वःता काढून घेण्याच्या सुचना पथकाने दिल्या.
उपायुक्तांनी फुले मार्केटची केली पाहणी
शहरातील फुले मार्केट मधील अतिक्रमण काही दिवसापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत काढण्यात आले होते. परंतू या ठिकाणी पून्हा अतिक्रमण झाल्याचे  उपायुक्त अजित मुठे यांच्या लक्षात आले. त्यामुळे उपायुक्त मुठे यांनी त्या ठिकाणी सात कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, उपायुक्त मुठे यांनी सायंकाळी अचानक  पाहणी केली असता फुले मार्केटमध्ये अतिक्रमण दिसून आल्याने अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान माहिती देवून सात कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
सात कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस
महात्मा फुले मार्केटमध्ये नियुक्तीस असलेल्या अतिक्रमण विभागातील सात कर्मचार्‍यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात ज्ञानेश्‍वर कोळी,सुनील कोल्हे, दिलीप भोसले,किशोर सोनवणे,सलमान भिस्ती,राजेश बाविस्कर यांचा समावेश आहे. कामात हलगर्जी केल्यामुळे सात कर्मचार्‍यांची अन्य विभागात बदली होण्याची  शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.