संग्रही ठेवावा असा दिवाळी अंक! – जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

0

लोकशाहीच्या लोकारोग्य दिवाळी अंकाचे प्रकाशन
जळगाव दि. 3 –

आरोग्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक, सर्वांना उपयोगी व कायम संग्रही ठेवावा, असा दैनिक लोकशाहीचा लोकारोग्य दिवाळी अंक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
दै.लोकशाहीच्या स्टुडिओत दि. 3 रोजी लोकारोग्य या दिवाळी अंकाचे सायंकाळी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. लोकारोग्य या महत्वपुर्ण अंकात नॅचरोपॅथी, होमियोपॅथी, अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, आहारशास्त्र, योगा आदी विविध उपचारपद्धतीबाबत विस्तृत माहिती आहे. त्यामुळे हा अंक सर्वांना यशदायी व सर्वांना उपयोगी पडेल असा आहे, असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर दै. लोकशाहीच्या संपादिका सौ.शांताताई वाणी, संपादक कमलाकर वाणी, सल्लागार संपादक धों. ज. गुरव, संचालक राजेश यावलकर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. यावेळी अंकाच्या संपादक मंडळातील डॉ. राजेश पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. प्रसन्न रेदासनी, डॉ. सौ. योगिता पाटील डॉ. संदिप पाटील, सौ.कल्पना नगरे, विनोद बियाणी, सुभाष सांखला, दिपक नगरे, सौ. शुभांगी यावलकर, नाजनीन शेख, दै. लोकशाही समुहातील विवेक कुलकर्णी, रमेश सोनवणे, जगदिश गंगावणे, मुबारक तडवी, कृष्णा पाटील, अमोल महाजन, विजय म्हस्के, मनोज पाटील, अमोल पाटील, ललीत कोळी, मोहन पाटील, सौ. जोशी, सौ. विमल कोळी, रोहित बारी, चंद्रकांत चौधरी आदी सहकारी उपस्थित होते.
सामाजिक भान जपलेला अंक- डॉ. राधेश्याम चौधरी
लोकारोग्य हा दिवाळी अंक कल्पकतेने बनविलेला आहे. दिवाळी अंकातून व्यवसायीक दृष्टीकोन न बाळगता सामाजिक भान जपलेला दिवाळी अंक आहे. इतर समुहासारखाच दैनिक, रेडिओ व मोबाईल चॅनल असलेला हा जिल्ह्यातील एकमेव समुह असल्याचा अभिमान असल्याचा गौरव त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.