शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो?- शरद पवार

0

नाशिक :- पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. देशावर कोणी हल्ला केला, तर मतभेद विसरून सगळे एकत्र येतात. यावेळीही सर्व एकत्र आले. मात्र भाजप त्यातून राजकीय फायदा घेत आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नाशिक लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘कार्यकर्ता संवाद’ या मेळाव्याचे आयोजन चोपडा लॉन्स येथे करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.

पुलवामा हल्यानंतर लष्काराने केलेल्या कामांचे कौतुक करीत भाजपवर जोरदार हल्लाही चढवला. ते म्हणाले, सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवून दिले, परंतु याचे भाजपाने भांडवल करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो? असा टोलाही त्यांनी लगावला.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होते. त्यावेळी शास्त्री देशाबाहेर असताना पाकिस्तान हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. लवकर निर्णय घेणे गरजेचे होते. पंतप्रधानांच्या सहमतीने असे निर्णय घेतले जातात. पण, त्यावेळी चव्हाण यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याचा आदेश सैन्याला दिला. त्यामुळे पाकिस्तानला तो पहिला धक्का होता. या अगोदर अनेक लढायला झाल्या, मात्र त्याचा पक्षीय राजकारणासाठी कधीही वापर केला गेला नाही. मात्र आता मोदी सैन्याचे राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.