डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका: व्यापार संधी तोडली

0

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (जीएसपी) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिनेटमध्ये दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार आहे.

जीएसपी अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती. या योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता. यानुसार 1970 पासून भारताला 5.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 40 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती. आता जीएसपीतून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा होणार नाही. अधिसूचना जारी झाल्यानंतर दोन महिन्यांनी हा बदल लागू होणार नाही. ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.