चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू-काश्मीर :- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. मागच्या तासाभरापासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता.

त्रालमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षादलांनी या भागाला घेराव घातला. पहाटे साडेचारपासून दहशतवादी आणि जवानांध्ये चकमक सुरु झाली. दोन दहशतवादी घरामध्ये लपले असल्याची माहिती मिळाली होती. सध्या गोळीबार थांबला असून शोधमोहिम सुरु आहे. ४२ राष्ट्रीय रायफल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.