शिवानी जोशी- पाठक यांना युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव येथील कथ्यक कलावंत शिवानी जोशी – पाठक यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र  युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार २०२१ प्रदान करुन गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा आणि संस्थापक अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पुरस्कार वितरण झाले. शिवानी ह्या प्रभाकर संगीत कला ऍकेडमीच्या  विद्यार्थिनी आहेत.

शिवानी जोशी या जळगावकर नृत्यांगना गेल्या बारा वर्षापासून नृत्य साधनेत आहे. त्याच प्रकारे नवनवीन उच्चांक शास्त्रीय नृत्य कलेत गाठत आहे.  याच वर्षी गांधर्व विद्यालयातून विशारद पदवी घेऊन पद्मश्री डॉक्टर पुरू दधीच यांच्या कथ्थकशास्त्र पदव्युत्तर डिप्लोमामध्ये विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्वतःचा शोधनिबंध ही आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला आहे.

 शिवानीने जळगावकरांचा अभिमान उंचावला 

शिवानी जोशी पाठक जळगावकर कन्या हिने आत्तापर्यंत पुणे, इंदोर, मुंबई, लखनऊ येथील  अनेक संस्थांबरोबर आपले नृत्याविष्कार सादर केले आहेत. काही व्यवसायिक मोठ्या बजेटच्या गाण्यांमध्येही आपल्याला शिवानीच्या कथक नृत्य आविष्काराची झलक पाहायला मिळेल व जळगावमध्ये इतर शास्त्रीय नृत्य कला प्रकारात प्रेरणा म्हणून शिवानीचे काम स्तुतीतुल्य आहे. डॉक्टर अपर्णा भट, पद्मश्री डॉक्टर पुरु दधीच यासह या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.