अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

१४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची  धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीतील शेख साखीर शेख कासम हे  परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा अय्यान उर्फ सोनू शेख साखीर (वय १४) हा सोमवार ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ च्या  सुमारास घरच्यांना घराबाहेर खेळायला जातो म्हणून सांगून गेला. मात्र तो घरीच न परतल्यामुळे घरच्यांनी त्याला परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. परंतु अय्यान उर्फ सोनू शेख साखेर हा मिळून आला नाही.

यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या मुलाला फुस लावून पळविले आहे. याची खात्री झाल्यानंतर शेख साखीर शेख कासम यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि बिरारी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.