रेल्वे स्थानकावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव रेल्वे स्थानकावर  ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आलाय.  जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून  ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्र ५ वर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी पंचनामा केला असता अनोळखी असल्याचे सांगण्यात आले. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे.

सदर तरूणाचा  दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. अंगावर निळ्या फिक्कट रंगाची जिन्‍स पॅन्ट, दाढी मिशी वाढलेली असे मयत तरूणाचे वर्णन आहे. ओळख पटल्यास जळगाव रेल्वे पोलीसांशी संपर्क करावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.