जैव इंधन निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार- एमपीओ प्रमिला थविल

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क   

जैव इंधन निर्मिती प्रकल्प व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती घडावी. भारत देश इंधनात स्वयंमपूर्ण व्हावा, तसेच ग्लोबल वार्मिंग सारख्या जागतिक समस्यांना रोखण्यासाठी जैव इंधन निर्मिती प्रकल्पाची गरज असून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन एमसीएलचे एमपीओ सौ. प्रमिला थविल,सुरगाणा यांनी केले आहे.

भारत देश 2030 पर्यंत इंधनात आत्मनिर्भर व्हावा हे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी एमसीएल इंडियाचे फाउंडर  डॉ.  श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये एकूण ५५०० प्रकल्प राबवले जात असून प्रमिला थाविल बायोफ्यूएल्स प्रा.लि.सुरगाणा व गिर्णव ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि.सुरगाणा हा प्रकल्प त्याचाच भाग असून सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जैव इंधन प्रकल्प माहिती व सेन्द्रिय शेती मार्गदर्शन व सभासद नोंदणी चालू आहे.

सभासद शेतकर्यांना मोफत बियाणे देणार असून त्यांच्याकडून कच्चा माल म्हणजेच हत्तिगवत (प्रति एकर दोन लाख रुपये उत्पन मिळणार), शेण, कचरा इ. हमीभावने विकत घेणार आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी लागणारी बियाणे, खते हमीभावाने देऊन पिकवलेल्या सेंद्रिय अन्न्धान्य, भाजीपाला, दुध उत्पादनाचे  खरेदी विक्री व्यवस्थापन करणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये छोटे कारखाने अडिच एकर मध्ये उभे करण्यात येत असून शेतकरी व तरुणवर्ग यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे.

प्रकल्पासाठी तालुक्यातील दोन ते अडीच हजार युवकांना रोजगार निर्मिती होणार असून त्यांना तालुका सोडण्याची गरज भासणार नाही. गावातील महिलांसाठी विशेष युनिट स्थापन करून त्यांना सक्षम बनवणार आहे. कंपनीचे सभासदत्व् घेतलेल्या प्रत्येकास रोजगार व शाश्वत उत्पन्नाची हमी कंपनी देत आहे. यामुळे सुरगाणा तालुका इंधनात आत्मनिर्भर होणार असून  तालुक्यात रोजगार र्निर्मिती, ग्रामस्वछता, आरोग्य व पर्यावरणाचे रक्षण  होणार आहे. यामुळे तालुक्यातील सर्वांनी या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येनें सहभागी होण्याचे आवाहन एमसीएलचे एमपीओ सौ प्रमिला मनोहर थविल सुरगाणा यांनी केले आहे.

सुरगाणा तालुक्यात शेतीपुरक उद्योग उभे नसल्याने युवा वर्गासमोर बेरोजगाराची समस्या आहे तसेच पारंपारीक शेतीत बदल न केल्याने शेतकर्यांच्या आर्थिक स्थिती मध्ये बदल घडून येत नाही, ही परिस्थिती जवळुन पाहता दुर्गम भागाचा विकास करण्याकरता जैव इंधन प्रकल्प सुरगाणा तालुक्यात सुरु केला आहे, या प्रकल्पाद्वारे शेतकर्यांचे उत्पन्न वाढणार असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. युवक व महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे सबलिकरण होणार आहे. निसर्गाचे रक्षण व कॅन्सरमुक्त शेतीद्वारे आरोग्यरक्षण तसेच देश इंधनात आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.

-एमपीओ सौ. प्रमिला मनोहर थविल, गारमाळ, सुरगाणा.

Leave A Reply

Your email address will not be published.