४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील बोले येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील बोरी येथे राहत असलेल्या ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहतात. गावातील दिलीप पुंडलिक निकम हा १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसला व महिलेशी अंगलट करत तिचा विनयभंग केला.

दरम्यान तिला मारहाण करून शिवीगाळ देखील केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दिलीप निकम याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.