शिवसेनेची आ. राजुमामा भोळेंबाबत नाराजी !

0

डॉ. सुनिल महाजनांसह विष्णू भंगाळे यांनीही घेतला अर्ज

जळगाव (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते विष्णू भंगाळे यांनी नगरसेवक प्रशांत नार्इक यांच्यामार्फत उमेदवारी अर्ज घेतला आहे. शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. शिवसेनेकडून विष्णू भंगाळे हे निवडणुक लढविणार असल्याचे प्रशांत नार्इक यांनी दै. लोकशाहीशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना प्रशांत नार्इक म्हणाले की. याबाबत पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्याकडे दोघांच्या मुलाखती झालेल्या असून त्यांच्याकडे जळगाव शहर मतदार संघाची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी केलीआहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाच्या खांद्याला खांदा लावून भाजपाचा प्रचार केला.  आ. राजुमामा भोळे यांनी महानगरपालिकेत युती होवून शिवसेना व भाजपाच्या प्रभागांचा समसमान विकास करण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. मात्र निवडणुका झाल्यावर त्यांना याचा विसर पडला आहे. शिवसेनेची युती होवून ही जागा शिवसेनेला सुटावी मात्र युती होवून जर ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली तर आमची आ. भोळेंवर तीव्र नाराजी असल्याने विधानसभेचा उमेदवार बदलावा अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

… तर शिवसेनेची बंडखोरी- डॉ. सुनिल महाजन

आ. भोळे हे शिवसेनेच्या  नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय लादतात. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा फक्त वापर करुन घेतल्याने नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.तरी भाजपाने विधानसभेचा उमेदवार बदलवावा अन्यथा आपण बंडखोरी करणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुनिल महाजन यांनी एका प्रसारमाध्यमाला दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.