घंटागाडीच्या स्टेफनीची भंगार बाजारात विक्री?

0

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाड्यांची तपासणी करण्याची गरज

जळगाव(प्रतिनिधी)-घंटागाड्यांच्या स्टेफनी, बॅटरी आदी सुट्या भागांची अक्षरश: भंगार बाजारात विक्री होत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन 85 घंटागाड्या मक्तेदाराला उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र याच घंटागाड्यांच्या सुट्या भागांची भंगार बाजारात विक्री होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहनांची पाहणी करण्याची गरज आहे.

घंटागाडीत मातीचा भराव टाकून मनपाला चुना लावण्याचा प्रकार दै.लोकशाहीने उघडकीस आणला होता. त्याचप्रमाणे आता ही नवीन माहिती समोर येत आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार खोळंबले

स्वच्छ भारत अभियानात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत महानगरपालिकेने नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला शहरातील स्वच्छतेचा मक्ता दिला आहे. या कंपनीच्या कामाला दि. 16 ऑगस्ट पासून सुरुवात झाली. कंपनीकडून 100 घंटागाडी चालकांसह 700 कर्मचारी कचरा उचलण्याचे काम करतात. त्यांना 469 रु. रोज ठरविण्यात आला आहे. कंपनीचे काम सुरु होवून दीड महिना उलटल्यावरही कर्मचाऱ्यांना रोजगार दिला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. यातूनच घंटागाडीचे सुटे भाग विकले जात असल्याची शक्यता सुत्रांनी व्यक्ती केली. मक्तेदारावरील नाराजीमुळे शहर स्वच्छतेचे कामात कर्मचाऱ्यांकडून कसूर होत आहे. शहरातील अनेक भागांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे.

महानगरपालिकेने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन खरेदी केलेल्या मोफत पुरविलेल्या वाहनांची अक्षरश: वाट लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन कारवार्इ करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.