पुढच्या महिन्यात तब्बल 11 दिवस बँका असणार बंद !

0

तात्काळ करुन घ्या महत्त्वाची कामं करून घ्या

मुंबई : उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटली की, लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडतात. पण ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँक बंद राहणार आहेत. ऑक्टोबरमध्ये तुम्ही जर का बँकांची कामे करणार असाल तर आधीच सर्व प्लानिंग करा नाहीतर ऐनवेळी खोळंबा होण्याची शक्यता आहे.

 

जाणून घेऊया ऑक्टोबरमधील बँकांच्या सुट्ट्या –

ऑक्टोबरमधील पहिली सुट्टी असणार आहे बुधवार, 2 ऑक्टोबर रोजी. या दिवशी गांधी जयंती असल्याने बँका बंद असणार आहेत.

त्यानंतर 6 ऑक्टोबर रविवार, 7 ऑक्टोबरला रामनवमी, 8 ऑक्टोबरला दसरा असल्याने सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.

पुढे 12 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार, तर 13 आणि 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे.

दिवाळी काळात बँकांना चार दिवस सुट्टी असणार आहे.

26 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार तर 27 ला रविवार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँक बंद राहतील.

या महिन्यातही सलग 4 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र बँकांनी आपला संप मागे घेतल्यानी ही परिस्थिती टळली. मात्र पुढच्या महिन्यात सर्व सरकारी सुट्ट्या असल्याने बँका 11 दिवस बंद राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.