शिवसेना – भाजप युतीला मुक्ताईनगरात सुरूंग

0

शिवसेना आक्रमक; खडसे कुटुंबियांना मदत करणार नाही शिवसैनिक पदाधिकारी यांचा ठाम निर्णय : ठिय्या आंदोलन

भुसावळ – दि.22 –
शिवसैनिक रिशीने पेंटून निघाले असून खडसे कुटुंबियांना मदत करणार नाही असा पवित्रा घेत रावेर मतदार संघातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी ठाम निर्णय घेत दिनांक 21 रोजी मुक्ताइनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले .
भाजप शिवसेना नेते युतीबाबत प्रचारासाठी आढावा घेत असतांना ह्याच युतीला मुक्ताईनगरात मोठा सुरुंग लागला आहे. युती तोडण्याची भाषा करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबद्दलचा राग मनात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकामध्ये कायम आहे. तसेच , सुरुवातीपासुन खडसेंनि शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे हे शिवसेना संपविण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडुन करण्यात आला . आणी म्हणूनच जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल यांनी समस्त शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुखा पर्यन्त पोहचविन्याचे आश्वासन यावेळी दीले . रावेर लोकसभेत खडसे कुटुंबियांना मदत करणारच नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल यांनि काही दिवसां अगोदर स्पष्ट केले होते.
लोकसभा निवडणुक अवघ्या एक महिन्यावर असतांना रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनि जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केल आहे. रावेरचि जागा शिवसेनेला सोडावी , अशी मागणी ह्या आंदोलना दरम्यान करन्यात आली
ह्या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकानी मनातील नाराजी व्यक्त केलीय असून ही नाराजगी आजची नसुन 25 वर्षापासुन आहे. जेवढा अत्याचार इंग्रजानी भारतीयांवर केला नाही तेवढा अत्याचार शिवसैनिकांवर झाला असल्याची टिका यावेळी अफसर खान यांनि खडसेंवर केली. यानंतर दबावतंत्राचा वापर करुन कार्यकर्त्यांवर झालेल्या खोट्या केसेसचा पाढा पाढा ऊपस्थितांना वाचुन दाखविण्यात आला .
युती तोडणा-या खलनायकाचे काम करणार नाही रे भोफ , मरावेर लोकसभा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अश्या विविध घोषणांनि परिसर दणाणला. शेवटी हेच ठिय्या आंदोलन शांत करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल यांनि शिवसैनिकाना भेटून काही दिवसां अगोदर बेलसवाडी येथील शिवसैनिकांचा खडसें यांनी भाजपमध्ये कसा प्रवेश करवुन घेतला , भाजप शिवसेना युती झाल्यानंतरही शिवसेना संपवण्याच काम हे खडसेंच चालु आहे , म्हणुन अश्या लोकांना शिवसेनेने मदत करायची का ? असा प्रश्न चंद्रकांत पाटिल यांनी ऊपस्थित करीत . पदाधिकारी तसेच शिवसैनिकांच्या ज्या ही मागण्या असतील त्यासाठी एक समिती स्थापन करुन त्या समितीद्वारे ऊद्धवसाहेबांना मातोश्रीवर भेटुन व्यथा मांडणार असल्याची चंद्रकांत पाटिल यांनी ग्वाही दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.