जामनेर येथील माहेश्वरी महिला मंडळाचा आगळा वेगळा उपक्रम

0

गरीब विद्यार्थ्यांना स्टीलच्या प्लेटा वाटप

जामनेर ( प्रतिनिधी ): – येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने वाकी रोड वरील जिल्हा परिषद मराठी शाळेतील सुमारे १८० विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्टीलच्या प्लेटा व त्यामध्ये नाश्ता वाटप करण्यात येऊन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
जि.प.मराठी शाळेत गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असून मंडळातर्फे दरवर्षी अशा गरीब मुलांना गणवेश वाटप तर कधी दप्तर वाटप असा उपक्रम राबविला जातो.मात्र यावर्षी काहीतरी वेगळा उपक्रम राबवण्याचा असा संकल्प महिला मंडळाच्या अध्यक्षा तारामती कलंत्री यांनी घेतला.या गरीब विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी उपयोगी येतील अशा १८० विद्यार्थ्यांना स्टीलच्या मोठ्या प्लेट भेट देण्यात आल्या.

आज जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गोरगरीब व सामान्यांची मुले शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांमधून ही अनेक मुले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करताना आपण पाहतो.या विद्यार्थ्यांमध्येही अनेक कलागुण असतात मात्र परिस्थितीमुळे खचून न जाता विद्यार्थ्यांनी जिद्द,मेहनत,चिकाटी ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्यावे,यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. गोरगरिबांची सेवा करण्यात खरे पुण्य असून गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी माहेश्वरी महिला मंडळ नेहमी उभे आहे.कोणाला काही अडचण पडल्यास आम्ही निश्चीत सहकार्य करू असे मंडळाच्या अध्यक्षा तारामती कलंत्री त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी महिला मंडळाचे उपाध्यक्ष किरण लखोटे,सचिव नंदिनी झंवर,शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव दामु पाटील,समाधान बाविस्कर,वंदना पाटील,शिक्षिका शिरसाठ मॅडम, सोनवणे मॅडम,बारी मॅडम, बाविस्कर मॅडम आदीसह मंडळाच्या सदस्यता व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.