शहापूरजवळ दुचाकी व चारचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

0

जामनेर,दि.24-
तालुक्यातील शहापूर गावाजवळील चारचाकी डंपर व दुचाकी मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात योगीराज किसन राठोड वय 35,व श्यामराव विष्णू चव्हाण वय 18, दोन्ही रा.घाणेगाव तांडा ता.सोयगाव जि.औरंगाबाद हे दोघ तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 -30 वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की,श्यामराव व योगीराज यांचा टेंटहाऊसचा व्यवसाय होता.लग्नसराई सुरु असल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी जळगाव येथे मंडप वॉशिंगसाठी टाकलेला होता.शनिवारी सकाळी हे दोघे जण दुचाकी क्रमांक एम. एच.19 एक्स.2665 ने घाणेगावहून फत्तेपुर जामनेर मार्गे जळगावला यायला निघाले असता शहापूर गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी डंपर क्रमांक एम.एच.15 सि.के.2674 ने दुचाकी मोटर सायकलला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने योगीराज याचा जागेवरच मृत्यू झाला.तर श्यामराव याला शासकीय रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. रुग्णवाहिकेतील डॉ.जुगल वाडीले व चालक दत्तात्रय पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.दरम्यान,या दुदैवी घटनेमुळे घाणेगावसह परीसरात शोककळा पसरलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.